sonalmm.blogspot.com
Silence Speaks..: Spiritual..
http://sonalmm.blogspot.com/2014/02/spiritual.html
Friday, February 21, 2014. We are not human beings going through a temporary spiritual experience. We are spiritual beings going through a temporary human experience. Subscribe to: Post Comments (Atom). View my complete profile. Little splash of colour. अनोळखी चेहरे. आधी आणि नंतर. Sandesh mhatre yancha premsandesh. Provided by accredited online degrees. FEEDJIT Live Traffic Feed. Watermark template. Template images by sbayram.
sonalmm.blogspot.com
Silence Speaks..: Little splash of colour
http://sonalmm.blogspot.com/2014/02/little-splash-of-colour.html
Saturday, February 22, 2014. Little splash of colour. Subscribe to: Post Comments (Atom). Rejuvenating old habit to write diary.a long lost hobby.a kind of addiction.hoping to get attached to it once again. so many thoughts come n disappear in the air.sometimes remembering those thoughts reintroduces urself to a new YOU.gives u a whole new outlook towards life.AND THERE A NEW STREAM IS CREATED THAT LEADS TO AGAIN A NEW DOOR. View my complete profile. Little splash of colour. आधी आणि नंतर.
asha-joglekar.blogspot.com
झु ळु क: March 2012
http://asha-joglekar.blogspot.com/2012_03_01_archive.html
Thursday, March 1, 2012. जीवनाचे सार. विसरते बघ मी तुला, तूही मला विसरून जा ,. प्रीतिच्या त्या आठवांना बासनी बांधून जा ।. काय केले, काय झाले, चूक माझी की तुझी,. राहू दे ना प्रश्न सारे, उत्तरें विसरून जा ।. भावनांची जळमटें तीं टाक आता झाडुनि. अन् नव्याने जीवनाला तू पुन्हा सामोर जा ।. विसरून जा तू ते तराणे गायलेले मिळुनिया. घे नवे स्वर, अन् नव्या दिवसांत तू हरवून जा ।. सौख्य कांही जीवनी आले तुझ्या हे ऐकुनी. आशा जोगळेकर. Labels: कविता. जीवनाचे सार. Subscribe to: Posts (Atom). आशा जोगळेकर.
asha-joglekar.blogspot.com
झु ळु क: April 2012
http://asha-joglekar.blogspot.com/2012_04_01_archive.html
Tuesday, April 17, 2012. क्षितिजाच्या पलीकडे. तुझी दुःखाची तलम चादर. त्यांत विणलेली शब्दांची कोमल फुलें. हात लावायला धजावत नाही मन. पण एक अपूर्व आकर्षण मात्र वाटतं. संध्याकाळची गूढ वेळ अन् तिचं तुझं नातं. नितांत वैयक्तिक पण तरीही. केंव्हा तरी प्रत्येकाच्या वाट्याला येणारं. ती तलम चादर पांघरूनच वावरलास सदैव. अचानक् एका दुपारी मात्र फेकून दिलीस ती चादर. अन निघून गेलास क्षितिजाच्या पलीकडे ।. आशा जोगळेकर. Labels: कविता. क्षितिजाच्या पलीकडे. Subscribe to: Posts (Atom). आशा जोगळेकर. Anderson, SC, United States.
asha-joglekar.blogspot.com
झु ळु क: March 2013
http://asha-joglekar.blogspot.com/2013_03_01_archive.html
Wednesday, March 27, 2013. उधळित रग गुलाल कन्हैया खेळे होळी. गोकुळ हे झाले दंग, भरली मस्ती ची झोळी ।. राधिका वाचवित अंग गोपिंच्या आड होतसे. सावरी त्वरेने पदर, झाकते ओली चोळी ।. पिचकारी उडवित येति गोप अन कृष्ण मुरारी. धावती गोपीं च्या पाठी मोडती नीटस ओळी ।. हा रास रंग पाहुनि लोक हे भान विसरले. जय जय हो राधा-कृष्ण, बोलती एकच बोली ।. कृष्ण रंगी भिजती आज पहा सारे ब्रिजवासी. जाहले कृष्णमय जगत, भक्ती ची पिकली पोळी ।. आशा जोगळेकर. Labels: होळी. Subscribe to: Posts (Atom). आशा जोगळेकर. Anderson, SC, United States.
asha-joglekar.blogspot.com
झु ळु क: July 2010
http://asha-joglekar.blogspot.com/2010_07_01_archive.html
Thursday, July 15, 2010. अंत वेळी. कसं आहे रूप तुझं, कसा आहे रंग. कसा आहे भाव तुझा, कसा तुझा ढंग ।. कसा आहे सूर तुझा, कसा तुझा ताल,. कसा नाचवितो आम्हा,कशी तुझी चाल ।. कसं आहे मन तुझं, कसे हाव भाव. कुठे आहे घर तुझं, काय तुझा गाव ।. कसं आहे हसू तुझं कसे आंसू तुझे. साग ना जातात कसे रात दिन तुझे ।. होतो का रे कधी तरी आमचा आठव. उघडतोस का आठवणींचा साठव ।. भजतोय आम्ही तुला आळवितो अती. पण तुझ्या कानीं त्यातलं जातंय किती ।. आशा जोगळेकर. Subscribe to: Posts (Atom). आशा जोगळेकर. Anderson, SC, United States.
asha-joglekar.blogspot.com
झु ळु क: September 2010
http://asha-joglekar.blogspot.com/2010_09_01_archive.html
Saturday, September 11, 2010. गणपति बाप्पा मोरया. लागला रे होता केंव्हांचाच ध्यास. आज माझी आस पुरविली ।. किती दिवसांनी आला देवा घरी. आनंद संसारी दाटियेला ।. यावे यावे देवा, स्वागत तुमचे. दाराशी तोरण नारळाचे ।. पाया वर घालू दूध आणि पाणी. प्रवासाचा शीण घालवाया ।. आसन देऊन स्थापना करूया. मखर सुंदर सजविले ।. सुगंधी जलाने स्नान करवू या. नवी आभरणें तुज लागी ।. चंदनाची उटी कस्तुरी तिलक. मस्तकी शोभती जवा फुले ।. दुर्वांची जुडी देईल थंडावा. मोदक प्रसादा ठेवियले ।. आशा जोगळेकर. Saturday, September 4, 2010. तु...
asha-joglekar.blogspot.com
झु ळु क: August 2010
http://asha-joglekar.blogspot.com/2010_08_01_archive.html
Thursday, August 19, 2010. प्राप्य. माझे मला मिळाले जे काहीं प्राप्य होते. मग आज ही कशाला ईर्षा फुकाच होते ।. जो तोच गुंतलेला व्यापात आज अपुल्या. त्यांना उगाच माझे ओझे कशास होते ।. हे भोग शरीरि माझ्या, सरतील ही उद्याला. जखमा मनांत ओल्या कुणि कां उगाच देते ।. माझेच कर्म सारे माझ्या समोर आले. मग आज मी अकारण अशी कां उदास होते ।. देशात गांजलेली जनता उपाशी असता. चापून मेजवानी, निजती खुशाल नेते ।. आतंक आज व्यापी देशास सर्व दूर. आशा जोगळेकर. Labels: मराठी गझल. Tuesday, August 3, 2010. Labels: कविता.
asha-joglekar.blogspot.com
झु ळु क: September 2012
http://asha-joglekar.blogspot.com/2012_09_01_archive.html
Saturday, September 8, 2012. प्रश्न आणि उत्तरं. किती आणि कसं, कुठे आणि केंव्हा. कधी आणि कुणी काय करावं. कसे कसे पडतात प्रश्न मनाला. कुणी द्यावी त्याची उत्तरं. कुणालाच तर माहीत नसतांत. मग सगळं आपलं अनुमान. खरं खरं रोक ठोक काहींच नाही. काय करावं, शोधावी उत्तरं कि. चालू द्यावं सर्व जसं चाललंय. मिटून कवाडं बाहेरची. डोकावलं आंत, तर. मिळतील ती उत्तरं. आशा जोगळेकर. Labels: कविता. प्रश्न आणि उत्तरं. Subscribe to: Posts (Atom). आशा जोगळेकर. Anderson, SC, United States. View my complete profile.
asha-joglekar.blogspot.com
झु ळु क: October 2010
http://asha-joglekar.blogspot.com/2010_10_01_archive.html
Monday, October 4, 2010. मन सुसाट पळते. मला नको तिथे नेते. नको नको मी म्हणता. नको तेच दाखवते ।. मन माजवते मनीं. किती काहूर काहूर. नाही नही ते विचार. करून हुर हूर ।. मन किती हे चपळ. जसे हरिण हरिण. क्षणि इथे क्षणि तिथे. ह्याचे कठिण कठिण ।. मन नाठाळ नदी से. वाहावते दूर दूर. बांध तोडून आणते. सर्वत्र महापूर ।. मन वा-या संगे नाचे. मन भिजे पावसांत. मन कधि हो ढगाळ. कधी तापते उन्हांत ।. ह्या मनाचे नाही खरे. ह्याचा लागेच ना ठाव. कधी वाटे जवळचे. कधी राखे दुजा भाव ।. आशा जोगळेकर. Labels: कविता.
SOCIAL ENGAGEMENT