anandyatra.blogspot.com
आनंदयात्रा (Anandyatra): May 2013
http://anandyatra.blogspot.com/2013_05_01_archive.html
आनंदयात्रा (Anandyatra). Wednesday, May 1, 2013. शहर नकोसे झाले! बंध स्वत:शी जुळता कोणी जवळ नकोसे झाले. इतके आवडले की शेवट शहर नकोसे झाले! रस्तोरस्ती फुलली होती गर्दी चिरकाळाची. तरी चांगली ओळख होती रस्त्याशी रस्त्याची! भटकत होतो गर्दीमध्ये एकटाच आनंदे. तर्हा वेगळी होती माझी इवल्याशा जगण्याची. जगण्यावरच्या प्रेमापायी मरण नकोसे झाले १. निसटुन जाती थेंब टपोरे अलगद टिपता टिपता. वार्यासंगे उडून जाती सुगंध बघता बघता. नचिकेत जोशी (३१/७/२०१२). नचिकेत जोशी. Links to this post. Labels: कविता. हजार फू...डो&...
anandyatra.blogspot.com
आनंदयात्रा (Anandyatra): March 2013
http://anandyatra.blogspot.com/2013_03_01_archive.html
आनंदयात्रा (Anandyatra). Tuesday, March 26, 2013. मनी तिच्याही भाव कदाचित. तिला पाहिजे नाव कदाचित. ती दिसली, पण दुखले नाही. भरून आला घाव कदाचित! चाल नेमकी अचूक झाली. हरेन आता डाव कदाचित. मिळाले तरी टिकले नाही. अखेर नडली हाव कदाचित. इथेच उरली आहे माती. इथेच होते गाव कदाचित. नचिकेत जोशी (२४/३/२०१३). नचिकेत जोशी. Links to this post. Monday, March 11, 2013. तुझ्यामाझ्यातले नाते. सुरू राहो अशी आनंदयात्रा, हात हाती दे. तसे आपण अचानक भेटलो ओसाड जगल्यावर. तिचाही जीव इवलासा! कुणासाठी? जगासाठी? इथे जगणे...
anandyatra.blogspot.com
आनंदयात्रा (Anandyatra): June 2013
http://anandyatra.blogspot.com/2013_06_01_archive.html
आनंदयात्रा (Anandyatra). Tuesday, June 25, 2013. फेफे' कवी उर्फ फेसबुक फेमस कवी होताना. भाग पहिला - 'आत्म'लक्षण. एखादा छानसा फोटो, प्रोफाईल पिक म्हणून लावा! वार्यावर भिरभिरणारी मुलगी (मुलगीच! डोंगराच्या कड्यावर लोळणारा मुलगा तिथे दिसायला हवा! पावसात तरारणारं पान, निळ्या छटांचं आभाळ. नुसतंच एखादं घड्याळ, प्रगल्भ सचिंत काळ. एखादी दीपमाळ, एखादी तलवार. एखादा सूर्यास्त, ढगांची रूपेरी किनार! अधूनमधून प्रोफाईल पिक बदलत रहा. भाग दुसरा - 'सामुहिक'लक्षण. इतपत साठवायला घ्या. हेही वापरा! आता असा प्...मिळ...
anandyatra.blogspot.com
आनंदयात्रा (Anandyatra): October 2014
http://anandyatra.blogspot.com/2014_10_01_archive.html
आनंदयात्रा (Anandyatra). Friday, October 17, 2014. आता नको! ज्येष्ठ गझलकारा संगीता जोशी यांची 'हे असे आभासवाणे चांदणे आता नको' ही ओळ व्हॉट्सअॅप वर एका गप्पांमध्ये मिळाली. त्यावर गझल लिहिण्याचा हा प्रयत्न.). लाघवी बोलून हे नाकारणे आता नको. हे असे आभासवाणे चांदणे आता नको. एकट्याच्या सोबतीला ज्याक्षणी आलीस तू -. अन् मला वाटून गेले, थांबणे आता नको! बहर ओसरताच आले भान वार्याला पुन्हा -. ह्या सुगंधाभोवती रेंगाळणे आता नको. एकही कुठलेच हळवे मागणे आता नको. नचिकेत जोशी (१७/१०/२०१४). Links to this post. बरो...
anandyatra.blogspot.com
आनंदयात्रा (Anandyatra): April 2014
http://anandyatra.blogspot.com/2014_04_01_archive.html
आनंदयात्रा (Anandyatra). Friday, April 25, 2014. शिवशाहिरांच्या आठवणींचा 'बेलभंडारा'. पुस्तकाचे नावः बेलभंडारा. लेखक - डॉ. सागर देशपांडे. प्रकाशन - सह्याद्री प्रकाशन. प्रथमावृत्ती - ३ ऑगस्ट २०११. किंमत - रू. ६९९. एखाद्याने व्यवहारात साधं-भोळं म्हणजे किती साधंभोळं असावं? एखाद्याने ध्यासमग्न जगावं म्हणजे नेमकं कसं जगावं? सगळीच मोठी माणसं वेडी असतात खरंच! काय काय आहे या पुस्तकात? एकदा नक्की वाचा! तासनतास 'राजा शिवछत्रपतीची' पारायणं करण्...अजून काय लिहू? बाबासाहेब पुरंदर&#...Links to this post. शाळ...
anandyatra.blogspot.com
आनंदयात्रा (Anandyatra): December 2013
http://anandyatra.blogspot.com/2013_12_01_archive.html
आनंदयात्रा (Anandyatra). Friday, December 13, 2013. बोलतो कितीतरी तरी कमीच शेवटी. राहते मनातले खरे मनीच शेवटी. चांगले असूनही इथे न भागते मुळी. पाहिजे इथे इमेज चांगलीच शेवटी. साथ द्यायला कुणीच आपली न धावती. वाटती तरी उगाच आपलीच शेवटी. चंद्र भोवती कुठे नकोच वावरायला. स्पेस चांदण्यासही जरा हवीच शेवटी. पाहतो निमूट सर्व जे घडेल ते तसे. लागतात अर्थ सर्व नेहमीच शेवटी. काय माहिती? कुणी असेलही, नसेलही! आसपास, अंतरात पोकळीच शेवटी. नचिकेत जोशी (१२/१२/२०१३). नचिकेत जोशी. Links to this post. Subscribe to: Posts (Atom).
anandyatra.blogspot.com
आनंदयात्रा (Anandyatra): July 2013
http://anandyatra.blogspot.com/2013_07_01_archive.html
आनंदयात्रा (Anandyatra). Saturday, July 13, 2013. सारे जुनेच आहे. सारे जुनेच आहे, काही नवीन नाही. नुसताच बहर वरती, खाली जमीन नाही. विस्तारली घराणी, झाली नवीन भरती. कुठलाच देव येथे, आता कुलीन नाही. शिरतात रोज भुरटे, भु़ंगे तरी अजुनही -. बागेतल्या फुलांची कीर्ती मलीन नाही. एका क्षणी समजते, सारे समान येथे! कोणी महान नाही, कोणीच हीन नाही. मन वागते कसेही, माझे कसे म्हणू हे? माझ्यात राहते पण, माझ्या अधीन नाही. नचिकेत जोशी (१२/७/२०१३). नचिकेत जोशी. Links to this post. Subscribe to: Posts (Atom). डों...शनि...
anandyatra.blogspot.com
आनंदयात्रा (Anandyatra): December 2014
http://anandyatra.blogspot.com/2014_12_01_archive.html
आनंदयात्रा (Anandyatra). Friday, December 26, 2014. तुझे दु:ख माझे'. तुझे दु:ख माझे'. कुणी बोललेले. खरे वाटलेले. कितीदा मनाला. सभोताल सारे. फुलारून येई. मला दूर नेई. भुलोनी जगाला. थरारून जावी. उभी सर्व काया. दिसे फक्त माया. खुळा जीव झाला. अकस्मात यावे. ढगानेच खाली. तसा भोवताली. महापूर आला. मला जागवाया. बिछानी तपेले. दिसे ओतलेले. तळे हे उशाला. तसे स्वप्न माझे. पुराच्या प्रवाही. उसासून वाही. सकाळी दहाला. तुझे दु:ख माझे'. कधी ऐकताना. हसू आवरेना. कितीदा मनाला. नचिकेत जोशी (२५/१२/२०१४). Links to this post.
anandyatra.blogspot.com
आनंदयात्रा (Anandyatra): October 2013
http://anandyatra.blogspot.com/2013_10_01_archive.html
आनंदयात्रा (Anandyatra). Friday, October 18, 2013. संहिता' प्रीमिअर सोहळा. नचिकेत जोशी. नचिकेत जोशी. Links to this post. Labels: प्रासंगिक. Wednesday, October 16, 2013. नाही विसरता येत. नाही विसरता येत इतक्या सहज -. गुंतून राहिलेले श्वास,. अडून राहिलेलं आयुष्य. न मागताही दिलेली स्वाधीनता. आणि बदल्यात मिळालेली अगतिकता. नाही विसरता येत -. संवाद टिकवण्यावरची भाषणं. अर्धवट सोडलेली संभाषणं,. सोयीस्करपणे बदललेल्या अपेक्षा. बेमालूमपणे झिडकारलेली नाती,. उच्च कळस बघताना खुपणारी. नचिकेत जोशी. Links to this post.
anandyatra.blogspot.com
आनंदयात्रा (Anandyatra): August 2014
http://anandyatra.blogspot.com/2014_08_01_archive.html
आनंदयात्रा (Anandyatra). Thursday, August 14, 2014. क्षणिक उमाळे. देशावरचे प्रेम उफाळुन येते. फेसबूकची भिंत थरारून येते. झोपेमध्ये घोरत असतो कायम. जाग मनाला मध्येच दचकुन येते. पोट स्वतःचे भरले की मग सार्या -. उपेक्षितांची भूक जाणवुन येते. पुष्कळ चर्चा होते पेपरमध्ये. जनता नंतर रद्दी देउन येते. कर्तव्यांचे भान अचानक होता. भाषणसुद्धा टाळ्या घेउन येते. क्षणिक उमाळे बघून हसतो आता. दया स्वतःची स्वतःस पाहुन येते. देश बिचारा जिथल्या तेथे असतो. नचिकेत जोशी (१४/८/२०१४). नचिकेत जोशी. Links to this post. डो&...