gammatganni.blogspot.com
बालविभाग: परीचा गाव
http://gammatganni.blogspot.com/2009/04/blog-post_29.html
बालविभाग. चला मुलांनो चलागम्मत गोष्टी वाचायला चला. परीचा गाव. स्वप्नांच्या राज्यात परीचा गाव. तिथली गंमत काय सांगू राव? तिथले चांदणे सोनेरी उबदार. उन मात्र तिथले शीतल गारगार. तिथे नाही चालायचे,नुसतेच उडायचे,. दिवसा घ्यायची झोप आणि रात्री खेळायचे. शाळा नाही ,अभ्यास नाही ,ढगातून फिरायचे,. चंद्राच्या झुल्यावर झोके घ्यायचे. आईस्क्रिमचे डोंगर नि थम्सअपची कारंजी,. कारंजात तरंगतात कांद्याची भजी. नदीतून गोडसे अमृत वहात असते,. Posted by अमोल केळकर. हे ब्लॉग पाहिलेत का? एक होती चिमणी. Earn your mba degree online.
gammatganni.blogspot.com
बालविभाग: खेळायचं खूप आता सुट्टीच सुट्टी.
http://gammatganni.blogspot.com/2009/04/blog-post_13.html
बालविभाग. चला मुलांनो चलागम्मत गोष्टी वाचायला चला. खेळायचं खूप आता सुट्टीच सुट्टी. सार्यांशी दोस्ती आता सार्यांशी गट्टी,. खेळायचं खूप आता सुट्टीच सुट्टी. खेळायचे घरी आता कॅरम आणि पत्ते. सार्या खेळात होईल माझीच फत्ते. अभ्यास करा,' अशी आता होणार नाही कटकट. टि.व्ही. बघताना कुणी करणार नाही वटवट।. पाण्यात पोहायचं.रानोमाळ हिंडायचं. पक्षांची गाणी एकत रहायचं. खूप खूप फिरायचं.प्रवासाला जायचं. इतिहासातले गड किल्ले पाहून यायचं. टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवायची. Posted by अमोल केळकर. तांबडवाडी.
gammatganni.blogspot.com
बालविभाग: बागुलबुवा आला !
http://gammatganni.blogspot.com/2009/05/blog-post_07.html
बालविभाग. चला मुलांनो चलागम्मत गोष्टी वाचायला चला. बागुलबुवा आला! Labels: बागुलबुवा. बागुलबुवा म्हणे आला. घाबरतो कोण त्याला? आला तर आला. घेऊन जाईल आईला. बागुलबुवा येऊन जा. आमच्या आईला घेऊन जा. मग येईल मज्जाच मज्जा. धुणी भांडी मीच करेन. पाण्यामध्ये खेळत बसेन. भाजी चिरीन, कुकर लावीन. पोळ्या करुन जेवायला वाढीन. नक्को नक्को दूधभात , पोळी नि तूप. गारेगार आईस्क्रिम खाईन मी खूप. बागेतली फुलं परडीत गोळा करीन. दगड -मातीचे घर मी बांधीन. बघायची नुसती म्हणतात सगळी. आईला घेऊन जाऊ नको. Posted by अमोल केळकर.
gammatganni.blogspot.com
बालविभाग: टिल्लू
http://gammatganni.blogspot.com/2009/04/blog-post_25.html
बालविभाग. चला मुलांनो चलागम्मत गोष्टी वाचायला चला. टिल्लू. छोटुकली आमची टिल्लू बाई, धावा पळायची हिला भारी घाई. पळता पळता धपकन पडते,पडता पडता भोकाड पसरते. लगबग करता आई येते,उचलून तिला कडेवर घेते. गोड गोड घेता साखरपापा, टिल्लूच्या सुरु होतात गप्पा. खेळायला जाईन म्हणते, चुकवून हिला,. तर माझ्याही आधी हिच्या पायात चपला. माझेच पुस्तक हवे, वाचायला हिला,. आणि गृहपाठाची वही, रेघोट्या काढायला. मैत्रीणींशी माझ्या बोलू देत नाही. अश्शी आमची टिल्लू द्वाड,. पण सारे करतात तिचेच लाड. Posted by अमोल केळकर.
gammatganni.blogspot.com
बालविभाग: गरगर गिरकी
http://gammatganni.blogspot.com/2009/04/blog-post_22.html
बालविभाग. चला मुलांनो चलागम्मत गोष्टी वाचायला चला. गरगर गिरकी. गरगर गिरकी गोल गोल. सांभाळा आपला तोल तोल. गरगर फिरता फिरेल अंगण. फिरतील झाडे घालीत रिंगण. गरगर फिरवा त्यांना गोल. सांभाळा पण आपला तोल! गरगर फिरता फिरेल घरही. फिरेल ताई, फिरेल आई. भरभर फिरवा त्यांना गोल. सांभाळा पण आपला डोल! गरगर भरभर, भरभर गरगर. जमीन फिरवा, फिरवा अंबर. फिरु दे सारे भवती गोल. जाऊ द्या रे आपला झोल! Posted by अमोल केळकर. हे ब्लॉग पाहिलेत का? साहित्याच्या प्रांगणात. मोरपिसाचा स्पर्श -. एक होती चिमणी. Earn your mba degree online.
gammatganni.blogspot.com
बालविभाग: तांबडवाडी
http://gammatganni.blogspot.com/2009/05/blog-post_11.html
बालविभाग. चला मुलांनो चलागम्मत गोष्टी वाचायला चला. तांबडवाडी. Labels: तांबडवाडी. निळे निळे डोंगर्,हिरवी हिरवी झाडी. झाडीत लपली तांबडवाडी. तांबडवाडीचे तात्याराव,. ढढं ढोल नुसते ,खाबुराव. तांबडवाडीच्या ताई अन् माई. नाचनाच नाचतात थई थय्यक थई. तांबडवाडीच्या तांबुआज्जी. गोष्टी सांगताना तळतात भजी. तांबडवाडीचे रस्ते लाल लाल. चालून याल तर मेंदी माखाल।. Posted by अमोल केळकर. हे ब्लॉग पाहिलेत का? साहित्याच्या प्रांगणात. मोरपिसाचा स्पर्श -. बालकविता - अनुक्रमणिका. एक होती चिमणी. तांबडवाडी.
gammatganni.blogspot.com
बालविभाग: पावसा, पावसा
http://gammatganni.blogspot.com/2009/05/blog-post_29.html
बालविभाग. चला मुलांनो चलागम्मत गोष्टी वाचायला चला. पावसा, पावसा. पावसा पावसा येऊन जा. तापलं अंगण निववून जा. कीट - घाण धुवून जा. नद्या - नाले भरुन जा. शेते - राने भिजवून जा. पिकांचं दान देऊन जा. पावसा पावसा, येऊन जा. सार्यांना हसावून निघून जा. जाता जाता, पावसा पावसा,. इंद्राचं धनुष्य ठेवून जा. Posted by अमोल केळकर. हे ब्लॉग पाहिलेत का? साहित्याच्या प्रांगणात. माझ्या अनुवादाची बोलू कौतुके. मोरपिसाचा स्पर्श -. बालकविता - अनुक्रमणिका. एक होती चिमणी. तांबडवाडी. प्रार्थना. बागुलबुवा.
gammatganni.blogspot.com
बालविभाग: चमकचांदणी
http://gammatganni.blogspot.com/2009/04/blog-post_14.html
बालविभाग. चला मुलांनो चलागम्मत गोष्टी वाचायला चला. चमकचांदणी. अंगणात रंगली गम्मत गाणी. गाण्यात उतरली चमक चांदणी।. चमक चांदणी ये लवकर,. इवल्या मुठीत वार्याला धर।. वार्याला उधळ जाई-जुईवर,. अंगणात फुलांची पखरण कर।. जाई अन् जुई टपटपली. अंगणात मुले नाचनाचली।. Posted by अमोल केळकर. हे ब्लॉग पाहिलेत का? साहित्याच्या प्रांगणात. माझ्या अनुवादाची बोलू कौतुके. मोरपिसाचा स्पर्श -. बालकविता - अनुक्रमणिका. एक होती चिमणी. गोष्टीच्या गावाला. तांबडवाडी. प्रार्थना. बागुलबुवा. Earn your mba degree online.
gammatganni.blogspot.com
बालविभाग: असावा सुंदर चॉकलेटचा बंगला -
http://gammatganni.blogspot.com/2009/11/blog-post.html
बालविभाग. चला मुलांनो चलागम्मत गोष्टी वाचायला चला. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला -. छोट्या दोस्तांचे आवडते बालगीत 'असावा सुंदर चॉकलेटचा बंगला' याची चित्रफीत युटयूबच्या सौजन्याने सर्वांसाठी. Posted by अमोल केळकर. हे ब्लॉग पाहिलेत का? देवा तुझ्या द्वारी आलो . धार्मीक स्तोत्रे, अध्याय , मंत्र यांचा संग्रह. साहित्याच्या प्रांगणात. माझ्या अनुवादाची बोलू कौतुके. मोरपिसाचा स्पर्श -. बालकविता - अनुक्रमणिका. एक होती चिमणी. गोष्टीच्या गावाला. तांबडवाडी. प्रार्थना. बागुलबुवा. Earn your mba degree online.